CRPF केंद्रीय पोलिस दलांत सुमारे सव्वा लाख पदे रिक्त! – CRPF Bharti 2023

CRPF केंद्रीय पोलिस दलांत सुमारे सव्वा लाख पदे रिक्त! – CRPF Bharti 2023

देशातील केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिस यांसारख्या केंद्रीय पोलिस दलांत एक लाख १४ हजार २४५ पदे रिक्त असल्याचे केंद्रीय गृहराज्य मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले. केंद्रीय पोलिस दलांतील भरतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला लिखित स्वरूपात उत्तर देताना मिश्रा यांनी सांगितले की, २०२३ मध्ये ३१ हजार ८७९ रिक्त जागांबाबत जाहिरात देण्यात आली होती. रिक्त पदांवर भरती करणे ही सतत चालणारी प्रकिया असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. गृहमंत्रालयाच्यावतीने या भरतीप्रक्रियेचा नियमितपणे आढावा घेण्यात येत असल्याचेही मिश्रा यांनी स्पष्ट केले.

या दलांतील पदे रिक्त
■ सीमा सुरक्षा दल

■ सशस्त्र सीमा बल

■ केंद्रीय राखीव पोलिस दल

■ इंडो-तिबेट सीमा पोलिस दल

■ आसाम रायफल
■ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल

■ दिल्ली पोलिस रिक्त पदांची गटनिहाय संख्या गट ‘अ’ : ३,०७५ ॥ गट ‘ब’ : १५,८६१ गट ‘क’ : ९५,३०९ आरक्षित पदांची संख्या ॥ अनुसूचित जाती : १६,३५६ ॥ अनुसूचित जमाती : ०८, ७६५ ॥इतर मागासवर्गीय : २१,९७४ ॥ आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग : ७,३९४

■ सर्वसाधारण वर्ग : ५९, ७६२

सीमा सुरक्षा दल (BSF) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात ‘सीआरपीएफ’मध्ये गेल्या ९ महिन्यांत तब्बल ३६,५२१ जवानांची भरती करण्यात आली आहे. तर, आणखी ७९,९६० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत दिली.

लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला केंद्रीय गृह राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनी लेखी उत्तर दिले. यात ते म्हणाले की, केंद्र सरकारने ‘मिशन भरती’ अंतर्गत ‘केंद्रीय सशस्त्र पोलीस दल’ (सीएपीएफ) पोलीस दल’ (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये भरतीसाठी मोहीम सुरू केली आहे.

 

मागील नऊ महिन्यांत ३६,५२१ जवानांची भरती करण्यात आली आहे. याशिवाय सीएपीएफ आणि आसाम रायफल्समधील विविध पदांच्या ७९,९६० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. भारत सरकारने रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी विविध प्रकारची पावले उचलली आहेत. ज्यात हवालदार पदांसाठी वार्षिक भरती, भरती समन्वयासाठी सैन्यात नोडल अधिकारी नियुक्त करणे, भरती उपक्रम राबविण्यासाठी सीएपीएफ आणि आसाम रायफल्सना निर्देश जारी करणे, वेळेवर परीक्षा आयोजित करणे, विभागीय पदोन्नती समितीच्या जागा कमी वेळेत भरणे आदींचा समावेश आहे.

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *