Jal sampda bharti जलसंपदा विभागात भरती

Jal sampda bharti जलसंपदा विभागात भरती

पाणी वितरणाचे काम करणारे जलसंपदा विभागात सध्या स्थितीत गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून यामुळे जलसंपदा विभागांतर्गत होणारी अनेक कामे मंदावली आहेत. या विभागाचे काम कार्यक्षमपणे होत नाही. दुष्काळ व पाणीटंचाईवर मात करायची असेल तर जलसंपदा विभागाची कार्यक्षमता वाढवायला हवी. त्यासाठी जलसंपदा विभागातील रिक्त पदे भरायला हवीत. या विभागात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गाची भरती गेल्या २०१३ पासून झाली नाही. यामुळे या विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदांची संख्या वाढली आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, गट ‘क’ वर्गाची सरळसेवा- ८०१४, पदोन्नती- ३१६३ अशी एकुण- १११७७ पदे रिक्त आहेत तर गट ‘ड’ वर्गाची सरळसेवा – ४७०२, तर पदोन्नतीने ३०६ एकूण ५००८ पदे ३१ मार्च २०२३ पर्यंत रिक्त होती. ३१ मार्च २०२३ ते ३० जून २०२३ या कालावधीत या रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली आहे. या विभागाची गट ‘क’ व गट ‘ड’ वर्गाची रिक्त पदे भरण्यासंदर्भात २०१३ पासून एकही जाहिरात न आल्याने रिक्त पदांची

संख्या वाढली असून ही पदे या वर्षी तरी भरावीत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याच्याकडे कोंकण विभाग कृषी पदवी व पदविकाधारक संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केली आहे. या पदासाठि केवळ कृषी पदवी, पदविका ही शैक्षणिक अर्हता करण्याची मागणी कोंकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. जलसंपदा विभागात गट ‘क’ व ‘ड’ वर्गाची भरती २०१३ पासून झाली नाही. या विभागात पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी व राज्यात सिंचन क्षमता वाढवणाऱ्या या विभागाचा प्रश्नांकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. यावर्षी तरी या विभागा रिक्त असणारी ही पदे भरण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे.

जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती होणार आहे. त्यातून क्षेत्रीय स्तरावर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. मनुष्यबळाची कमतरता दूर होण्यासाठी वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून घ्यावेत, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली. 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *