Jilha parishad bhartichi jahirat augustmadhe जिल्हा परिषद भरती

Jilha parishad bhartichi jahirat augustmadhe जिल्हा परिषद भरती

जिल्हा परिषदेतील पद भरतीची जाहिरात ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता लातूर जिल्हा परिषदेच्या खात्रीलायक सूत्रांनी दिली. जिल्हा परिषद पद भरती संदर्भात, येत्या चार दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. व्हीसीद्वारे राज्यस्तरावरून मार्गदर्शन केले जाणार आहे. पद भरतीबाबत डेमो वेबसाईट जाहीर झाली आहे. जाहिरात कधी येणार, यासंबंधाने सुशिक्षित तरूणांकडून सातत्याने विचारणा होत आहे. राज्यातल्या काही जिल्हा परिषदांनी आकृतीबंध तयार न केल्याने पद भरतीस विलंब होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. जिल्हा परिषदांच्या अधिकाऱ्यांच्या मानात पद भरतीबाबत फारसी उत्सुकता दिसत नाही, अशी चर्चा सुशिक्षित तरूणांत सुरू आहे. आता डेमो वेबसाईट सुरू करून देखील दोन महिने होऊन गेले. मात्र, अजून जाहिरात निघालेली नाही. त्यामुळे सरकारच्या कारभाराबद्दल विश्वासार्हता घसरत असल्याची चर्चा आहे.

२०१९ साली राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये सरळ सेवा भरती आयोजित करण्यात आली होती. ही भरती प्रक्रिया लेखी परीक्षा घेऊन करण्यात येणार होती. मात्र ऐनवेळी ही भरती राज्य शासनाने रद्द केली. ज्या उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा शुल्क भरले आहे, त्या उमेदवारांना परीक्षा शुल्क परत देण्याचे शासनाने आदेश काढले आहेत. या परीक्षेसाठी सोलापूर जिल्हा परिषदेकडे विविध संवर्गातून विविध पदांसाठी ३२ हजार उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले होते. 

परीक्षा शुल्क परत देण्यासाठी उमेदवारांची ओळख पटावी यासाठी रविवारी (९ जुलै) राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मुख्यालयात कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पच्या माध्यमातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमार्फत संबंधित उमेदवारांचे फोन नंबर, बँक अकाउंट नंबर आदी माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. मात्र उमेदवारांनी भरलेल्या परीक्षा शुल्काची किर्त टक्के रक्कम परत करण्यात येणार याबद्दल शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अद्याप निर्देश प्राप्त झाले नाहीत.

 

सोलापूर जि. प. कडून ३२ हजार उमेदवारांचा डाटा संकलित करण्याचे काम सुरू

२०१९ साली रद्द झालेल्या सरळ सेव भरती परीक्षेसाठी सोलापूर जिल्हा परिषदेकडे विविध संवर्गातील, विविध पदांसाठी ३२ हजार उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले होते रविवारी (९ जुलै) सोलापूर जिल्हा परिष मुख्यालयात कॅम्प आयोजित करून २८ कर्मचाऱ्यांद्वारे त्या ३२ हजार परीक्षार्थीच डाटा संकलित करण्याचे काम सुरू होते किती टक्के परीक्षा शुल्क परत मिळणार हे स्पष्ट होणार

२०१९ साली रद्द झालेल्या सरळ सेवा पद भरती परीक्षासंदर्भात संबंधित उमेदवारांनी भरलेल्या परीक्षा शुल्कापैकी किती शुल्क परत करावयाचे यासंदर्भात आज सोमवारी (१० जुलै) दुपारी २ वाजता शासनाचे अपर मुख्य सचिव व्ही.सी. घेऊन राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत. यानंतरच त्या उमेदवारांना किती टक्के परीक्षा शुल्क परत मिळणार हे स्पष्ट होणार आहे.

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *