Jilha adhikari karyalay usmanabad madhe nokrichi sandhi उस्मानाबाद मध्ये नोकरीची संधी 2023

जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद मध्ये नोकरीची संधी 2023

जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद अंतर्गत “विशेष सहायक सरकारी अभियोक्ता” पदांच्या ०९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील इच्छुक विधीज्ञ यांनी आपले अर्ज जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद यांचे नावाने जिल्हादंडाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे आपले वैयक्तीक माहितीसह (Bio Data) दिनांक 14/7/2023 (सुटीचे दिवस वगळुन कार्यालयीन वेळेत ) पर्यंत सादर करावेत. नमुद तारखेनंतर आलेली आवेदन पत्रे स्विकारली जाणार नाहीत वा त्यांचा विचार केला जाणार नाही.

 • पदाचे नाव – विशेष सहायक सरकारी अभियोक्ता
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
 • वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील अर्जदाराचे वय 38 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गातील अर्जदाराचे कमाल वयोमर्यादा 43 वर्षे राहील
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023
 • अधिकृत वेबसाईट – osmanabad.gov.in

अर्ज ऑफलाईन पद्धतीने

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • इच्छुक उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक अर्हता व अनुभवासंबंधीच्या प्रमाणपत्रासह जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांच्या नावाने अर्ज तयार कराव व सदर अर्ज उपजिल्हाधिकारी रोहयो यांचे कार्यालयामध्ये दिनांक २६ मे २०२३ पावेतो कार्यालयीन वेळेत सादर करावा.
 • उशीराने प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 • उपजिल्हाधिकारी रोहयो कार्यालयामध्ये प्राप्त होणा–या अर्जाची छाननी करण्यात येईल व छाननी अंती प्राप्त झालेले अर्जाची नामांकने मुळ कागदपत्रासह खालील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे शासनास सादर करण्यात येतील.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2023 आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

उमेदवाराच्या पात्रतेच्या अटी खालील प्रमाणे आहेत. 

1. अर्जदार भारताचा नागरीक असावा.
2. अर्जदार कोणत्याही विद्यापिठाचा विधी पदवीधर असावा आणि त्यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडे वकील म्हणुन नोंदणी केलेली असावी.
3.अर्जाच्या दिनांकास शासनाच्या दिनांक 25 एप्रिल 2016 रोजीचे शासन निर्णयानुसार 05 वर्षा शिथीलतेमुळे खुल्या प्रवर्गातील अर्जदाराचे वय 38 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गातील अर्जदाराचे कमाल वयोमर्यादा 43 वर्षे राहील.
4.उमेदवाराने वयासंबंधीताचा विधीग्राहय पुरावा सादर करावा.
5.उमेदवाराने पाच वर्षे वकीली व्यवसाय केलेला असावा आणि तदसंबंधीत बार असोसिएशन यांचेकडील प्रमाणपत्र आवेदन पत्रासोबत जोडणे बंधनकारक राहील.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *