Krushi Sevak Bharti कृषी सेवक भरती सुरु

Krushi Sevak Bharti कृषी सेवक भरती सुरु

महाराष्ट्र कृषी सेवक भरतीला अखेर सुरवात जाही आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. सध्या या भरती अंतर्गत पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक,लातूर, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या १८८२ पदांच्या  भरतीच्या  जाहिराती आल्या आहे. अन्य जिल्ह्यांच्या जाहिराती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू. 

  1. उमेदवारांना कृषी सेवक नाशिक वेबसाइट https://krishi.maharashtra.gov.in/  वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करायचे आहे.
  2. तसेच उमेदवर खालील दिलेल्या लिंक वरून देखील थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.
  3. ऑनलाइन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानुसार उमेदवाराने त्याचा/ तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
  4. उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांना विनंती केली जाते की त्यांनी पात्रतेच्या तारखेनुसार या पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 


राज्यात अतिवृष्टीमुळे ज्यांच्या घरांचे आणि संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यांना पूर्वी पाच हजार रुपये नुकसान भरपाई दिली जायची, ती आता दहा हजार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच, ज्या टपरीचालकाचे नुकसान झाले आहे, त्यांनाही ५० हजार रुपये भरपाई दिली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले.

शिंदे म्हणाले की, महिला बचत गटाचे खेळते भांडवल १५ हजार रुपये होते, ते आता ३० हजार रुपये देण्यात येणार आहे. महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू केंद्र सरकारच्या युनिटी मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे.

कृषी सेवक हा गावपातळीवर काम करणारा आहे. कृषी सहायकांच्या बरोबरीने सरकार आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे तसेच मार्गदर्शन करण्याचे काम कृषी सेवक करत असतात. या कृषीसेवकांना तुटपुंज्या ६००० रुपये मानधनावर काम करावे लागत होते.

राज्याच्या कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त असलेल्या दोन हजार ५८८ जागांपैकी दोन हजार ७० जागा लवकरच भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागा सरळसेवेच्या कोट्यातील असल्याने आणि या संवर्गातील रिक्त पदांचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नसल्याने, एकूण रिक्त जागांपैकी ८० टक्के जागाच भरण्यात येत आहेत. यानुसार कृषी विभागाच्यावतीने दोन हजार ७० जागांच्या भरतीच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास राज्य सरकारची मंजुरी मिळताच, याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.

 

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *