Krushi vibhagat arj karnyachi ajun ek sandhi उद्या पासू अर्ज सुरु

Krushi vibhagat arj karnyachi ajun ek sandhi उद्या पासू अर्ज सुरु

राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 13 जुलै 2023 पासून दिनांक 22 जुलै 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव –लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी)

पदसंख्या – ६० जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज शुल्क –

अमागास – रु. ७२०/-

गासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-

वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे

मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 जुलै 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.on

कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी जाहीराती दि.०३ एप्रिल, २०२३ ते दि.०६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर जाहिरातीस अनुसरुन अर्ज करण्यासाठीचा अंतीम दिनांक ३० एप्रिल, २०२३ असा होता.

शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, दि. ४ मे, २०२३ अन्वये खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या तसेच मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. सदरच्या शासन निर्णयातील तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने (Retrospective) दिनांक २९.९.२०२२ नंतरच्या पदभरतीसाठी अमलात येतील.

कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी विज्ञापित केलेल्या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रणालीमध्ये जुन्या निकषानुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावर अर्ज करण्यासाठी नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसणाऱ्या महिला उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदाकरीता अर्ज करता आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती पाहता तसेच शासन निर्णयातील तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने अमलात आलेल्या असल्याने ऑनलाईन अर्ज करता न आलेल्या उमेदवारांना संधी देणे आवश्यक आहे, ही वस्तुस्थिती विचारात घेता सरळसेवा भरतीसाठी आवेदन पत्र सादर करण्यासाठी १० दिवसांची मुभा दण्याचा निर्णय विभागाने घेतलेला आहे.

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *