Krushi Vibhagat arj Shevthchi tarik कृषी विभागात ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

Krushi Vibhagat arj Shevthchi tarik कृषी विभागात ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील 218 रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 13 जुलै 2023 पासून दिनांक 22 जुलै 2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत.

 • पदाचे नाव –लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी)
 • पदसंख्या – 218 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज शुल्क –
  • अमागास – रु. ७२०/-
  •  गासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-
 • वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – 13 जुलै 2023
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2023
 • अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in

कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील वरिष्ठ लिपीक, सहाय्यक अधीक्षक, लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी जाहीराती दि.०३ एप्रिल, २०२३ ते दि.०६ एप्रिल २०२३ या कालावधीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सदर जाहिरातीस अनुसरुन अर्ज करण्यासाठीचा अंतीम दिनांक ३० एप्रिल, २०२३ असा होता.
शासन निर्णय, महिला व बालविकास विभाग, दि. ४ मे, २०२३ अन्वये खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या तसेच मागास प्रवर्गातील महिलांनी नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. सदरच्या शासन निर्णयातील तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने (Retrospective) दिनांक २९.९.२०२२ नंतरच्या पदभरतीसाठी अमलात येतील.
कृषी आयुक्तालय व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी विज्ञापित केलेल्या जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रणालीमध्ये जुन्या निकषानुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावर अर्ज करण्यासाठी नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसणाऱ्या महिला उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदाकरीता अर्ज करता आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती पाहता तसेच शासन निर्णयातील तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने अमलात आलेल्या असल्याने ऑनलाईन अर्ज करता न आलेल्या उमेदवारांना संधी देणे आवश्यक आहे, ही वस्तुस्थिती विचारात घेता सरळसेवा भरतीसाठी आवेदन पत्र सादर करण्यासाठी १० दिवसांची मुभा दण्याचा निर्णय विभागाने घेतलेला आहे.

वरिष्ठ लिपिक – १०५ जागा
शैक्षणिक पात्रता- किमान द्वितीय श्रेणी पदवीधर

सहाय्यक अधीक्षक– ५३ जागा
शैक्षणिक पात्रता-  कोणत्याही शाखेतील पदवी

 

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लघुटंकलेखक १. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

२. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

लघुलेखक (निम्न श्रेणी) १. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

२. लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

लघुलेखक (उच्च श्रेणी) १. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

२. लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुटंकलेखक S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (निम्न श्रेणी) S-१४ : ३८६००- १२२८०० (सुधारित – S-१५ : ४१८००-१३२३००) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (उच्च श्रेणी) S-१५ : ४१८००-१३२३०० (सुधारित – S-१६ : ४४९००-१४२४००) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

 

अर्ज पद्धती

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 •  उमेदवाराला कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संकेतस्थळावर लॉगइन (Log in) करावे लागेल.
 • अर्ज 13 जुलै 2023 पासून सुरु होतील.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 जुलै 2023 आहे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • या भरतीकरिता अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
 • तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक13 जुलै 2023 पासून दिनांक 22 जुलै 2023 या कालावधीमध्ये करता येईल.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
 1. सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल.
 2. सदर परीक्षेमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. ८.१.२
 3. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण व व्यावसायिक चाचणीमध्ये प्राप्त गुण अशा एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
 4. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक व वेळापत्रक कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
 5. संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा ६० प्रश्नांची व १२० गुणांची असेल. त्यासाठी ७५ मिनिटांचा कालावधी राहील.
 6. संगणक आधारीत ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहील:
 कृषि विभागातील कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विविध नियुक्ती प्राधिकारी यांचे आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक, सहाय्यक अधीक्षक, लघु टंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) पदांसाठी भरती-2023
Important Events Dates Reopen
Commencement of on-line registration of application 06/04/2023 13/07/2023
Closure of registration of application 30/04/2023 22/07/2023
Closure for editing application details 30/04/2023 22/07/2023
Last date for printing your application 15/05/2023 06/08/2023
Online Fee Payment 06/04/2023 to 30/04/2023 13/07/2023 to 22/07/2023

Krushi Vibhag Bharti 2023भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 शुद्धिपत्रक  https://shorturl.at/gmACU
📑 PDF जाहिरात  shorturl.at/anoK4 
📑ऑनलाईन अर्ज करा  shorturl.at/afmKV
✅ अधिकृत वेबसाईट 
krishi.maharashtra.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *