Mahapareshan Parali Bharti  10 वी & ITI उत्तीर्णांना संधी

Mahapareshan Parali Bharti  10 वी & ITI उत्तीर्णांना संधी

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, परळी, बीड अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)” पदाच्या एकूण 137 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2023 आहे.

 • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
 • पद संख्या – 137 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वयोमर्यादा – १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
 • नोकरी ठिकाण – परळी, बीड 
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2023
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. ४३१५१५.
 • अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

Mahapareshan Parali Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) 137 पदे

 

 

Educational Qualification For Mahapareshan Parali Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Salary Details For Mahapareshan Parali Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागु राहिल.

How To Apply For Mahatransco Parali Bharti 2023

 • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
 • उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण चे गुणपत्रक (Marksheet) व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय (वीजतंत्री) परिक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमीस्टरचे एकत्रित गुणपत्रक, आधारकार्ड अपलोड करणे आवश्यक आहे.
 • सदर भरती प्रक्रियेकरिता दि. २५.०८.२०२३ ते ०४.०९.२०२३ या कालावधी दरम्यान ऑनलाईन (Online Apply) अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल. वर नमुद दिनांकाच्या नंतर म्हणजेच दि. ०४.०९.२०२३ रोजीच्या नंतर ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचा भरती / निवड प्रक्रियेकरीता विचार केला जाणार नाही याची सुध्दा नोंद घ्यावी
 • ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर या जाहीराती सोबत जोडलेले प्रपत्र अस्वच्छ अक्षरात परीपूर्ण भरुन उपरोक्त नमुद केलेल्या आस्थापनेवर (Online Apply) केलेल्या अर्जाची प्रत व मुद्या क. ०२ मध्ये नमुद आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रांच्या साक्षांकीत / स्वसाक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती दि. ०८.०९.२०२३ पूर्वी अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, अउदा संवसु मंडळ, जुने पॉवर हाऊस, वैद्यनाथ मंदिर रोड, परळी वै. ४३१५१५. या पत्यावर साध्या टपालपोस्टव्दारे किंवा स्वहस्ते पोहचेल या बेताने पाठवावेत तसेच सदर प्रपत्र आवश्यक कागदपत्र / प्रमाणपत्रांसह विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यास आपल्या अर्जावा भरती/निवड प्रक्रीयेसाठी विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/beoQX
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/BLOQR
✅ अधिकृत वेबसाईट
www.mahatransco.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *