Maharashtra Shikshak Bharti शिक्षक-शिक्षकेतरांची भरती

Maharashtra Shikshak Bharti शिक्षक-शिक्षकेतरांची भरती

राज्यातील शिक्षकांची भरती ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातूनच केली जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. त्यासाठीची कार्यवाही सुरू असताना दुसरीकडे सरकारने बाह्ययंत्रणेकडून (कंत्राटदार) राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक भरण्याचा निर्णय घेतला आहे.

पाच वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडलेलीच

  • पवित्र पाेर्टलवर शासनाने २०१७ मध्ये सुरू केलेली भरती प्रक्रिया २०२३ मध्येही पूर्ण झाली नाही.
  • १९६ व्यवस्थापनाच्या जागांसाठी सुरू असलेल्या मुलाखतींकडे अनेक उमेदवार पाठ फिरवत आहेत.
  • पाच वर्षांत अनेक विद्यार्थ्यांनी दुसरी नाेकरी स्वीकारली आहे. त्यानंतर आता त्यांना मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे.
  • त्यातही मिळालेल्या शाळा लांबच्या असल्यानेही उमेदवार मुलाखतीसाठी येत नसल्याचे चित्र आहे.

 

नाेंदणीही सुरू हाेईना

पवित्र पाेर्टलवर विद्यार्थ्यांची नाेंदणीही सुरू झाली नाही. जवळपास दाेन लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी पाेर्टलवर नाेंदणी करणार आहेत, त्यासाठी १० ते १५ दिवसांचा अवधी लागणार असल्याने शासनाने पाेर्टलवर विद्यार्थ्यांची नाेंदणी सुरू करावी, अशी मागणी हाेत आहे़.

… असे हाेते वेळापत्रक

  • पवित्र पाेर्टलवर जाहिरात अपलाेड करणे : १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट
  • उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची सुविधा : १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर
  • निवड यादी प्रसिद्ध : १० ऑक्टाेबर
  • मुलाखतीशिवाय घेण्यात येणाऱ्या शाळांसाठी कागदपत्र पडताळणी : ११ ऑक्टाेबर ते २० ऑक्टाेबर
  • पदस्थापनेसाठी समुपदेशन : २१ ऑक्टाेबर ते २४ ऑक्टाेबर

 

 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *