Navi Mumbai Mahanagarpalika Bharti नवी मुंबई महानगरपालिका भरती

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti नवी मुंबई महानगरपालिका भरती

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सेवानिवृत्त शासकीय / निमशासकीय अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेणेसाठी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक संकिर्ण- 2715/प्र.क्र.100/13 दिनांक 17 डिसेंबर 2016 मधील तरतुदीनुसार शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेमधील गट अ (ग्रेड वेतन रु. 7,500/- पेक्षा कमी) या संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी यांचेकडून “सल्लागार” पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक अर्जदारांनी आपले परिपुर्ण अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 26/07/2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रशासन विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भु.क्र. 1, किल्ले गावठाणजवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर 15ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400 614 येथे उपस्थित रहावे.

 • पदाचे नाव – सल्लागार
 • पद संख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
 • नोकरी ठिकाण – नवी मुंबई
 • वयोमर्यादा – ५८ ते ६३ वर्ष
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासन विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भु.क्र. 1, किल्ले गावठाणजवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर 15ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400 614
 • अर्ज करण्याची तारीख – 26 जुलै 2023
 • अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in

पदाचे नाव पद संख्या 
सल्लागार 0 पदे

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सल्लागार अर्हता :- पदवीधर व संगणक विषयी ज्ञान

अ) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थेमधील गट-अ पदावरील कामकाजाचा किमान 3 वर्ष अनुभव आवश्यक

आ) करार पद्धतीने नियुक्त करावयाचा सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता असावी.

इ) करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त अधिकारी यांच्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.

अर्ज पद्दती:

 • वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्दतीने करायचा आहे.
 • इच्छुक अर्जदारांनी आपले परिपुर्ण अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह दिनांक 26/07/2023 रोजी सकाळी 11 वाजता प्रशासन विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भु.क्र. 1, किल्ले गावठाणजवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर 15ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400 614 येथे उपस्थित रहावे.
 • उक्त अर्हता धारण करणा-या उमेदवारांनी स्वतः चा पासपोर्ट साईज फोटो (2), आधारकार्ड, पॅनकार्ड आणि सोबत आवश्यक सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह सादर करणे आवश्यक राहील.
 • कागदपत्र पडताळणीसाठी शैक्षणिक अर्हता व अनुभव प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व स्व-साक्षांकित छायांकित (Self Attested Xerox) प्रतीसह हजर रहावे.
 • अर्ज सादर करताना व कागदपत्रे पडताळणीसाठी स्वखर्चाने हजर रहावे लागेल.
 • विहित अर्हता व अटी पूर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास, खोटी अथवा चुकीची माहिती सादर केल्यास त्याची उमेदवारी त्याच टप्प्यावर रद्द करण्यात येईल. याबाबत कोणताही पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. त्यामुळे अर्जामध्ये माहिती काळजीपुर्वक भरावी.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/ekozJ
✅ अधिकृत वेबसाईट
www.nmmc.gov.in

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *