Pune mahanagarpalika madhe kanisth abhiyatikanchi पुणे महापालिका भरती

Pune mahanagarpalika madhe kanisth abhiyatikanchi पुणे महापालिका भरती

पुणे महापालिकेत १० वर्षांपासून पदभरतीवर बंदी असल्याने मोठ्याप्रमाणात जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांची नियुक्ती करून कामे केली जात होती. पण गेल्या वर्षी राज्य सरकारने भरतीवरील स्थगिती उठविल्याने प्रशासनाने नोकर भरती सुरू केली आहे. गेल्यावर्षी १३५ कनिष्ठ अभियंत्यांसह विविध पदांच्या ४४८ जागांची भरती प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ९ पदांवरील ३२० जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांची नुकतीच ऑनलाइन परीक्षा झाली आहे. त्याचा निकाल लागल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

भरती सुरू असताना आता ११० कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सात उपकामगार अधिकारी, एक उपमुख्य अग्निशमन अधिकारी, एक विभागीय अग्निशमन अधिकारी, एक सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयबीपीएस संस्थेसोबत पुढील चर्चा करून या पदांसाठी जुलै महिनाअखेरपर्यंत जाहिरात काढून उमेदवारांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश झाल्याने हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विविध विभागांवर त्याचा ताण येत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता पदासाठी तीन वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

एकीकडे  ही भरती सुरू असताना आता १०० कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सात उपकामगार अधिकारी, एक उपमुख्य अग्निशमन अधिकारी, एक विभागीय अग्निशमन अधिकारी, एक सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयबीपीएस संस्थेसोबत पुढील चर्चा करून या पदांसाठी जुलै महिना अखेर पर्यंत जाहिरात काढून उमेदवारांकडून अर्ज मागविले जातील.

पुणे महानगरपालिका, कर आकारणी व कर संकलनविभाग अंतर्गत “वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा), सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा), वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2), सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता, कर संकलन आणि सामंजस्य” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *