Rajya rakhiv piloce bharti 2022 पोलीस भरती लेखी परिक्षा तारखा जाहीर

राज्य राखीव पोलीस भरती लेखी परिक्षा तारखा जाहीर ! SRPF Police Bharti 2022 Written Exam Date

उपरोक्त संदर्भ व विषयास कळविण्यात येते की, आपल्या आस्थापनेवरील नवप्रविष्ठ सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रीया-२०२१ करीता ७५ रिक्त पदांकरीता उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर मैदानी चाचणी झालेले उमेदावारांपैकी २५६२ पात्र उमेदवारांची दिनांक १६.०७.२०२३ रोजी लेखी परिक्षा घेण्याचे नियोजित आहे.

तसेच गटमुख्यालयातील उपस्थित कंपनी / विभागातील पोलीस अधिकारी यांनी लेखी परिक्षेच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने दिनांक १४.०७.२०२३ ते दिनांक १६.०७.२०२३ रोजी पर्यंत कालावधीमध्ये नैमत्तीक /अर्जित रजेचे विनंती अर्ज सादर करुन किंवा रजा उपभोगण्याची कार्यवाही करुन नये यांची सबंधितांनी नोंद घ्यावी.

लेखी परिक्षा नवीन अपडेट :

राज्यातील १८ हजार ३३१ पदांची पोलिस भरती अंतिम टप्प्यात आली आहे. तृतीयपंथी उमेदवारांच्या मैदानी चाचणीचे निकष ८ दिवसांत निश्चित होऊन त्यांची परीक्षा पार पडणार आहे. त्यानंतर चालक व शिपाई उमेदवारांची लेखी परीक्षा अनुक्रमे २६ मार्च आणि २ एप्रिल रोजी होणार आहे.

जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात सुरु झालेली पोलिसांची मैदानी चाचणी त्याच महिन्यांत संपली. परंतु, दीड महिन्यांपासून ना मैदानीचा निकाल ना लेखी परीक्षा, अशी स्थिती होती. यंदा प्रथमच उच्च न्यायालयाने तृतीयपंथींना पोलिस भरतीसाठी परवानगी दिली. त्यानंतर पोलिस भरतीसाठी राज्यभरातून दीडशे ते दोनशे तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केले. त्यांच्या मैदानी चाचणीचे निकष स्वतंत्रपणे ठरविण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र समिती नेमली.

पोलीस शिपाई चालक भरती 2021 मध्ये मैदानी चाचणी व कोशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या उमेदवाराची लेखी परिक्षा दिनांक 19/03/2023 रोजी सकाळी 7.00 ते 8.30 या कालावाधीत घेण्यात – येणार असून संबंधीत उमेदवार यांना सकाळी 05.00 वाजता पोलीस मुख्यालय सोलापूर शहर येथील कवायत मैदानावर हजर राहण्याबाबतचे सुचना देण्यात यावे असे मा. पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना कळविण्यात आले होते. परंतु सदरची लेखी परिक्षा ही 19.03.2023 रोजी न होता पुढे ढकलण्यात आलेली आहे पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल.

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *