Shikashak bharti babat motha nirnay शिक्षक भरतीबाबत मोठा निर्णय!

Shikashak bharti babat motha nirnay शिक्षक भरतीबाबत मोठा निर्णय!

गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षकभरती न झाल्याने अनेक डीएड्, बीएड् (D.Ed., B.Ed) झालेले विद्यार्थी शिक्षण घेऊनही बेरोजगार राहिले आहेत. रिक्त असलेल्या शिक्षक जागांवर (Teacher Recruitment) मानधन तत्त्वावर नियुक्त्या झाल्याने त्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. मात्र, शासनाने राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेरोजगार डीएड्, बीएड्धारकांचा शिक्षक होण्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्याला महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेकडून (Primary Teachers Association) विरोध केला जात आहे.

 


 

‘पवित्र’द्वारे अशी होणार भरती

‘टेट’ परीक्षेनंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी महाराष्ट्र परीक्षा परिषदेने शिक्षण आयुक्तालयास सादर केली आहे. आता न्यायालयाची स्थगिती उठल्यानंतर ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरतीला सुरवात होणार आहे. तत्पूर्वी, आधारबेस्‌ड संचमान्यता होईल. त्यानंतर मेरिट लिस्टनुसार संबंधित उमेदवारांना जिल्हा परिषदा व त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांची निवड करावी लागेल. खासगी संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनाही ‘पवित्र’ पोर्टलवरच पर्याय द्यावे लागणार आहेत. त्यांनतर उपलब्ध रिक्त जागा व उमेदवारांचा प्राधान्यक्रम, यानुसार त्यांच्या नेमणुका होतील. खासगी संस्थांना रिक्तपदांची जाहिरात देऊन ती जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार आहे. त्यानुसार त्यांना उमेदवार दिले जाणार आहेत.

शिक्षक भरती इतक्यात नाहीच

शिक्षक भरती करण्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाला सर्व शाळांची संचमान्यता पूर्ण करावी लागणार आहे. आता आधार प्रमाणीकरण असलेलेच विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यानंतर किती जागा रिक्त व किती अतिरिक्त हे स्पष्ट होईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि त्यानंतर शिक्षकांची रिक्तपदे भरली जाणार आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी आणखी किमान एक महिना तरी लागेल, असा अंदाज आहे.

शिक्षक भरतीची स्थिती

  • एकूण अंदाजे रिक्तपदे
  • ६७,०००
  • झेडपी शाळांमधील रिक्तपदे
  • ३२,०००
  • खासगी संस्थांची रिक्तपदे
  • ३५,०००
  • पहिल्या टप्प्यातील भरती
  • ३२,०००

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *