Talathi bharti parikeshcha marg mokla तलाठी भरती लेखी परीक्षेचा मार्ग मोकळा 2023

Talathi bharti parikeshcha marg mokla तलाठी भरती लेखी परीक्षेचा मार्ग मोकळा 2023

भूमी अभिलेख विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या सुमारे साडेचार हजार पदांसाठीच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पदांसाठी दिव्यांगांचे आरक्षण डावलून परीक्षा घेण्यात येणार असल्याची तक्रार दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे करण्यात आली होती. मात्र, हे आरक्षण प्रांत स्तरावरून आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून, त्याबाबत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे ही परीक्षा आता सुरळीत पार पडेल, अशी माहिती राज्याचे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली. राज्य सरकारने तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ४ हजार ६४४ पदांसाठी परीक्षा घेण्याचे ठरवले. १७ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. मात्र, यासाठी दिव्यांगांचे आरक्षण डावलण्यात आल्याचा आरोप दिव्यांगांच्या संघटनांनी केला होता. या पदांसाठी मंगळवारपर्यंत दोन लाख ५९ हजार ५६६ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची १७ जुलैनंतर छाननी केली जाईल. त्यानंतर, परीक्षा होईल. ऑक्टोबरमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही उमेदवारावर जमाबंदी विभागाची भूमिका आहे. अन्याय होणार नाही, अशी उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. उमेदवारांसाठी एका मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्याचा लाभ घ्यावा.

महसूल विभागाद्वारे आज नवीन शुद्धिपत्रक (दि ११ जुलै २०२३) प्रकाशित करण्यात आहे आहे. त्यानुसार  तलाठी भरती २०२३ चा सदर अर्ज भरताना अर्जदाराने संपुर्ण जाहिरात व सविस्तर सुचना व्यवस्थितपणे वाचून, समजून अर्जाबाबतची माहिती काळजीपुर्वक व अचुक भरणे अपेक्षित आहे. तसेच अर्जदाराने अर्जाबाबत भरलेली माहिती त्याने शुल्क भरुन अर्ज अंतिमरित्या सादर करेपर्यंत दुरूस्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, परंतु, अर्जदाराने शुल्क भरल्यानंतर  (Final Submit) केल्यानंतर त्याला अर्जामध्ये कोणतीही दुरूस्ती करता येणार नाही. त्याबाबत संकेतस्थळावर तसेच जाहिरातीमध्ये नमुद केलेले आहे. तेव्हा उमेदवारांनी शुल्क भरण्याआधी अर्ज काळजीपूर्वक पुन्हा पडताळून बघावा, कारण एकदा आपण शुल्क भरल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.

राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात 23 June रोजी  शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. तसेच  १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख द्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *