Talathi Bharti arj karnys mudatvadh तलाठी भरती मुदतवाढ

Talathi Bharti arj karnys mudatvadh तलाठी भरती मुदतवाढ

भूमी अभिलेख विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या ४६४४ पदांसाठी सोमवारपर्यंत दहा लाखांवर अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जुलै होती, परंतु प्राप्त अर्जाची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक आल्याने उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली आहे. आता १८ जुलै २०२३ पर्यंत उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे. तसेच तलाठी पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. या अर्जांची १८ जुलैनंतर छाननी केली जाईल. त्यानंतर, परीक्षा होईल. ऑक्टोबरमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. कोणत्याही उमेदवारावर जमाबंदी विभागाची भूमिका आहे. अन्याय होणार नाही, अशी उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. 

महसूल विभागाद्वारे आज नवीन शुद्धिपत्रक (दि ११ जुलै २०२३) प्रकाशित करण्यात आहे आहे. त्यानुसार  तलाठी भरती २०२३ चा सदर अर्ज भरताना अर्जदाराने संपुर्ण जाहिरात व सविस्तर सुचना व्यवस्थितपणे वाचून, समजून अर्जाबाबतची माहिती काळजीपुर्वक व अचुक भरणे अपेक्षित आहे. तसेच अर्जदाराने अर्जाबाबत भरलेली माहिती त्याने शुल्क भरुन अर्ज अंतिमरित्या सादर करेपर्यंत दुरूस्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, परंतु, अर्जदाराने शुल्क भरल्यानंतर  (Final Submit) केल्यानंतर त्याला अर्जामध्ये कोणतीही दुरूस्ती करता येणार नाही. त्याबाबत संकेतस्थळावर तसेच जाहिरातीमध्ये नमुद केलेले आहे. तेव्हा उमेदवारांनी शुल्क भरण्याआधी अर्ज काळजीपूर्वक पुन्हा पडताळून बघावा, कारण एकदा आपण शुल्क भरल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही.

राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात 23 June रोजी  शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज २६ जून २०२३ पासून सुरु होणार आहेत. तसेच  १८ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख द्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *