Van Vibhag Bharti वन विभाग भरती

Van Vibhag Bharti वन विभाग भरती

वन विभाग भरती संदर्भातील नवीन अपडेट जाहीर झाला असून, खालील सेक्शन मध्ये आपण माहिती बघू शकता.

प्रादेशिक व वन्यजीव विभाग वगळता इतर शाखेत कार्य करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास हक्काचे कार्यालय नाही. सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना भाड्याच्या जागेत कार्यालय थाटावे लागते. रोहयोच्या कामांची सक्ती केली जाते. मात्र, त्यांच्याकडे लिपिक वर्ग नाही किंवा शासकीय वाहने दिली जात नाही. सामाजिक वनीकरणात आरएफओंची २५९ पदे असून यात बहुतांश रिक्त आहेत. तर प्रादेशिकच्या आरएफओंना वाहनासाठी इंधनखर्च मिळत नाही, हे वास्तव आहे.

 

वेतनक्षेत्र /बदलीत दुजाभाव
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे पद हे तहसीलदार, ठाणेदार या पदाच्या समक्ष मानले जाते. मात्र, वेतनश्रेणीत या दोन्ही पदांपेक्षा कमी वेतन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास मिळते. ही तफावत कित्येक वर्षांपासून कायम आहे. संरक्षण व संवर्धनात कुचराई केल्यास आरएफओंना जबाबदार धरले जाते. मध्यंतरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास एका विंगमधून दुसऱ्या विंगमध्ये काम करण्याची सक्ती केली आहे. मात्र, वनरक्षक, वनपाल, आणि वरिष्ठ स्तरावर सहायक, वनसंरक्षक, उपवनसंरक्षक यांना या सक्तीमधून वगळण्यात आले आहे, असा दुजाभाव वनविभागात होत असल्याने कमालीचा असंतोष निर्माण झालेला आहे.

 

वरिष्ठांची पदे वाढली.
राज्यात वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक आयएफओ पदांची संख्या काम नसताना वाढविल्या गेली आहे. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे पद महत्त्वाचे असताना केवळ ९३८ पदे सद्यस्थितीत राज्यात कार्यरत आहे. वनविभागातील सर्व शांखाचा विचार करता ९०० पदे कमी आहेत. आकृतिबंधानुसार वनपरिक्षेत्राची पुनर्रचना झालेली नाही. राज्याच्या वनविभागात किमान १०० प्रादेशिकचे परीक्षेत्र तयार करण्यास वाव असताना वन मंत्रालय याबाबत ठोस भूमिका घेताना दिसून येत नाही.

 

वनपालांची सरळ सेवा भरतीबंद
सन २०१० पासून राज्याच्या वनविभागात सरळ सेवा वनपाल भरती पूर्णत: बंद करण्यात आली आहे. वनरक्षकांना या पदावर पदोन्नती दिली जात आहे. वास्तविक बघता वनपाल हे पद लोकसेवा आयोगामार्फत २५ टक्के भरल्यास आरएफओंना सहायक म्हणून उपयोगात येऊ शकते, तर दुसरीकडे पदोन्नत आरएफओ व सरळ सेवा असा भेदभाव वनविभागात असा सुरू आहे.

 

 

 

प्राप्त माहिती नुसार वन विभाग अंतर्गत गट ब, क, ड भरती संदर्भातील नवीन GR प्रकाशित झाला आहे. या शासन निर्णयात विविध रिक्त पदांचा गोषवारा मागविण्यात आला आहे. या नुसार लवकरच पुढील काही दिवसात भरती प्रक्रिया सुरु होणे अपेक्षित आहे.

गट-क मधील ट्रक चालक, गृहप्रमुख, लॉच चालक, ग्रंथालय परिचर, पशु परिचर व गट- ड मधील शिपाई, खलाशी, पहारेकरी, सहाय्यक स्वयंपाकी, चेनमॅन, नौका तांडेल या पदांबाबत शासन पत्र दिनांक ३१/१/२०२३ मधील सुचनांनुसार भरती प्रक्रिया राबवावी व प्रचलित सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन मागणीपत्र तात्काळ जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावे व तसे या कार्यालयास अवगत करावे. ही कार्यवाही ६/२/२०२३ पर्यंत पूर्ण करावी.

सा.प्र.वि. शासन निर्णय दि. १/२/२०२३ मधील तरतूदीनुसार वनरक्षकांची अनुसूचित क्षेत्रातील पदे व बिगर अनुसूचित क्षेत्रातील पदे निश्चित करण्यात यावीत व त्यानुसार बिंदूनामावली प्रमाणित करुन घेऊन पदांचे मागणीपत्र सोबतचे विवरणपत्रात वनविभागनिहाय या कार्यालयास सादर करावे. तसेच सर्व वनविभाग मिळून वनवृत्ताचा एकत्रित गोषवारा सादर करावा. लेखापाल पदाचे मागणीपत्र या कार्यालयाने पत्र क्र. २९१, दिनांक १/२/२०२३ अन्वये ठरवून दिलेल्या विवरणपत्रात या कार्यालयास सादर करावा.

GR पहा

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *