Zilla Parishad Bharti 2023 ZP नोकरभरतीची डेमो लिंक जाहीर

Zilla Parishad Bharti 2023 ZP नोकरभरतीची डेमो लिंक जाहीर

 जिल्हा परिषदेमधील कर्मचारी भरतीप्रक्रियेमध्ये डेमो लिंकची पडताळणीसाठी काही जणांकडून अर्ज भरून घेण्यात आले. त्याद्वारे उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे आठवडाभरात निवारण करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागवण्यासाठी जिल्हास्तरावरूनच केली जाणार आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठीची प्रक्रिया आणि प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. आतापर्यंत प्रत्येक टप्प्यावर या भरतीची जाहिरात लांबणीवर पडत चालली आहे. गेल्या आठवडाभरात अंतिम लिंक आणि होणार निवारण कर्मचारी भरतीची जाहिरात येत्या काही दिवसांत येण्याची शक्यता आहे.

 

 

राज्यात तलाठी भरतीनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कर्मचारी भरती असणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि अनुषंगिक सर्व तपशील उपलब्ध करून जाहिरातीची अंतिम तयारी पूर्ण झाली आहे. डेमो लिंकनंतर अंतिम लिंक पाठवण्यासाठी ग्रामीण विकास विभागाकडून सूचना येताच, जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची प्रक्रिया आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचे डेमो लिंक पाठवण्यात आली होती. त्यामध्ये काही उमेदवारांनी शंका उपस्थित केली होती, त्याचे निराकरण करण्यात येत आहे. कर्मचारी भरतीसाठी सुमारे २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारी भरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता. यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीने एकूण सर्व २७ संवर्गासाठी अभ्यास निश्चित केला आहे. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता ठरवलेली आहे.

वाहन चालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली असून ही पदभरती जिल्हा निवड मंडळ तसेच जिल्हा परिषद अंतर्गत होणार आहे. एकूण रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गट क वर्गासाठी होणारी ही पदभरती जिल्हा निवड मंडळ आणि जिल्हा परिषद अंतर्गत होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकर भरती करण्यात येत असून यात ग्रामविकास विभागाची ही नोकर भरती महत्त्वाची ठरत आहे.

ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांमधील गट क संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत गट क संवर्गातील २,५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के म्हणजे २,०३० जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते ७ मेदरम्यान भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून यासाठी निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *