ZP Teachers Recruitment जिल्हा परिषद शिक्षक भरती

ZP Teachers Recruitment जिल्हा परिषद शिक्षक भरती

जिल्हा परिषदेच्या शाळांना ५८१ शिक्षक मिळणार आहेत. जिल्हा परिषदेकडून बिंदुनामावली अंतिम करून मागासवर्गीय कक्षाकडे मान्यतेसाठी पाठविली आहे. त्यानंतर पदभरतीला प्रारंभ होणार असून बिंदुनामावलीनुसार अनुसूचित जाती-जमाती, भज-ब आणि खुला, अशा चार प्रवर्गातील तेवढी पदे सध्या रिक्त आहेत.

झेडपी शाळांची सद्य:स्थिती

  • एकूण शाळा
  • २७९५
  • केंद्रप्रमुखांकडील शाळा
  • १०
  • मंजूर केंद्रप्रमुख
  • १९९
  • केंद्रप्रमुखांची रिक्तपदे
  • १८०

पदोन्नतीतून ८२ जण होणार केंद्रप्रमुख

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता ८२ केंद्रप्रमुखांची नेमणूक केली जाणार आहे. पात्र पदवीधर म्हणून तीन वर्षे सेवा बजावलेल्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने ती पदे भरली जातील. दुसरीकडे ज्या शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत, त्याठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याची कार्यवाही सुरु आहे.

– संजय जावीर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सेवानिवृत्त शिक्षकांची अजूनही नाही नेमणूक

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या ६९० शिक्षकांची पदे रिक्त आहेत. संचमान्यता, त्यानंतर अतिरिक्त झालेल्यांचे समायोजन आणि शिक्षक भरती, अशी प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. तोवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्या शाळांवर ७० वर्षांपर्यंतचे सेवानिवृत्त शिक्षक नेमले जाणार आहेत. शासनाचा निर्णय देखील झाला, शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे त्यांच्या तालुक्यातील इच्छुकांची यादी पाठविण्याचे आदेश दिले. पण, अद्याप कोणीच शिक्षणाधिकाऱ्यांकडे यादी दिलेली नाही. त्यामुळे ‘निर्णय वेगवान, गतिमान प्रशासन’चा अनुभव विद्यार्थ्यांसह पालकांना येत आहे.

पदोन्नतीची फाइल ‘सीईओं’कडे निर्णय कधी?

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांवरील ८२ शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्याची कार्यवाही तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यकाळात पार पडली. पण, त्याच्या अंतिम मान्यतेसाठी आता ती फाइल नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याकडे आहे. त्यावर आता कधीपर्यंत निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हास्तरावर होणाऱ्या प्रेरणा परीक्षेची तयारी सुरू
शिक्षकांच्या जिल्हास्तरावर होणाऱ्या प्रेरणा परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. परीक्षार्थीना आसन क्रमांक देणे, केंद्र निश्चिती करणे, पर्यवेक्षकांची नियुक्ती, प्रश्नपत्रिका, उत्तपत्रिका छपाई, उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यासाठी ओएमआर मशिनची व्यवस्था करण्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने सूचना दिलेल्या आहेत, परंतु दुसरीकडे किती शिक्षकांनी परीक्षेसाठी अनुमती दिली, याची माहिती अद्याप शिक्षण विभाग, तसेच आयुक्त कार्यालयाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नेमके किती शिक्षक परीक्षा देणार, हे स्पष्ट झालेले नाही.

साठी ०.२५ गुण वजा करण्यात येणार आहेत.

Ganesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *